तुम्ही मूर्ख आहात की शहाणे?

१. दोघे बोलत असताना मध्ये शिरून लुडबुड करता का?

२. भांडण पाहत उभे राहून कौतुक पाहता का?

३. स्वतःची आणि वडिलांची कीर्ती सांगत बसता का?

४. स्वतःचे प्रयत्न न करता दुसऱ्यावर अवलंबून राहता का?

५. सभेमध्ये बोलताना लाजता का?

६. विद्या, वैभव, धन, सामर्थ्य नसताना अभिमान बाळगता का?

७. स्वच्छता आणि नीटनेटकेपणाकडे दुर्लक्ष करता का?

८. समर्थांचा मत्सर करता का?

९. स्वतःचे काम होईपर्यंतच नम्रता दाखवता का?

१०. सत्यता न पडताळता माहिती पसरवता का?

Page Views: 0